Saturday, 21 January 2012

ती अशीच बसली होती , खिडकीतून बाहेर बघत. लोक येताजाता दिसत होती पण तिला अर्थ कळत नव्हते.आपल्याच विचारांमध्ये हरवली होती. शून्यातच नजर होती तिची. काय चाललाय तिच्या मनात काही कळत नव्हत. घरातल्या सगळ्यांना तीच गप्प गप्प राहाण जाणवत होत, ती तासान तास खिडकीत बसून रहायची. ते पण हतबल होते, सगळ्या नातेवाईकांना , शेजाऱ्यांना कस तोंड द्याव हे कळत नव्हत त्यांना. प्रत्येकजण हेच विचारात होता, "अस कस झाल? तुमाला काहीच कस कळाल नाही? तुमी काहीच प्रयत्न केले नाहीत का?' असे आणि असेच प्रश्न पण बिन उत्तरांचे...काय उत्तर देणार ? तीन काय काय भोगलं हे सांगत बसणार का? 
घरातले सगळे आधीच त्रस्त झाले होते या सगळ्या प्रश्नांमुळे, त्यात तीच हे अस वागण. काहीच कळत नव्हत, या सगळ्याचा शेवट काय असेल ते?. आईच्या आग्रहाने ती दोन घास खात होती इतकाच.
आणि या सगळ्यात ती , सगळ तिच्याबद्दल घडत असूनही, सगळ्यांपासून अलिप्त असलेली. सगळ जाणवत असूनही, काहींही जाणवत नाही अस दाखवणारी. आतल्या आत तुटणारी..प्रत्येकवेळी स्वतःलाच प्रश्न विचारणारी , 'का अस? मीच का? माझीच चूक आहे ', अस म्हणून आतल्याआत रडणारी. 
खरंच काय चूक होती तिची? अस काय घडलं होत? आई-वडिलांनी खूप हौसेन वाढवलं होत तिला. परिस्थिती चांगली नसताना सुद्धा तिची जमेल तशी हौस मौज पुरवली होती....फक्त तिच्यासाठी अस नही तर तिच्या भावासाठी सुद्धा. आई-बाबांचं त्या दोघांवर खूप प्रेम होत आणि तिच्या भावाचं तिच्यावर. तिच्यावर संस्कार करताना त्यांनी दक्षता घेतली होती , कि आपली मुलगी मुळूमुळू रडत बसणार नाही कधी, तर त्यातून मार्ग काढेल.
होता होता ती मोठी झाली आणि तिच्या लग्नाची चर्चा घरात व्हायला लागली. असाच एका संध्याकाळी तो , घरी आला , तिला पाहायला. तो आला, त्यान पहिला , आणि जिंकाल. अशीच काहीशी तिची अवस्था झाली. तिला सगळीकड तोच दिसू लागला. तीप्रत्येक क्षण त्याने व्यापला होता. 
घरातले सगळेच जण खुश होते. तो, त्याचे आई-वडील, त्याचं नम्रपणे वागण, सगळ सगळ घरात आवडलं होत. तीचावर तर अगदी प्रेमाचा वर्षावाच सुरु होता...ती अगदी सुखात होती. आणि, लग्नाचा दिवस जवळ येऊन ठेपला. तिला जाणीव झाल, आता घरापासून दूर जायचं. या घरात आपण असणार नाही. आई, बाबा, दादा कोणीच जवळ असणार नाही. आपण रोज त्यांना भेटणार नाही, रोजच्या गोष्टी एकमेकांना सांगितल्या जाणार नाहीत...घरातला रोजचा दिवस तसाच असणार पण आपण असणार नाही..आणि आणि आपली रोजच्या दिवसात ते असणार नाहीत...ती हळवी झाली...हसता हसता डोळ्यात पाणी जमा व्हायला लागल. आईच्या लक्षात आली तिची अस्वस्थता. ती पण अशीच आली होता न तिच्या आई-बाबांचं घर सोडून!! तिला आई खूपच जवळची वाटायला लागली...आतामात्र दिवस होणाऱ्या नवऱ्याबरोबर काढण्या एवजी ती आई-बाबां बरोबर काढू लागली...पण मनातले प्रश्न काही संपत नव्हते. कस असेल सासरच वातावरण? सगळे आत्ता तरी चांगले वागताहेत , पण ते असेच असतील ना? कसा असेल त्यांचा रोजचा दिवस? आपल्या हातून काही चूक होणार नाही ना? समजून घेतील ना ते आपल्याला? एक ना हज्जार प्रश्न. आणि या सगळ्याच कालच उत्तर देणार होता...
आणि लग्नाचा दिवस आला सुद्धा म्हणेपर्यंत लग्न झाल सुद्धा तीच. ते सगळेजण घरी आले. आता हेच तिच्पण घर असणार होत, कायमच. तिच्या मनात हुरहूर दाटून आली. आईच्या कुशीत शिरवास वाटू लागल. आणि तो तिच्या जवळ आला. तिच्या खांद्यावर त्याचा आश्वासक हात जाणवला तिला...मन थोड शांत झाल. 
तिच्या मनातले प्रश्न तात्पुरते संपले. नवीन जागा, नवीन लोक, नवीन जगण्याची पद्धत, सगळ सांभाळत , जमवत राहिली ती.
नव्या नवलाईचे दिवस संपले आणि खऱ्या अर्थाने आयुष्य सुरु झाल. ती वास्तवात आली. रोजच आयुष्य सुरु झाल. नोकरी, घर या चक्रात अडकत गेली .नवरा, सासू-सासर्यांच्या प्रेमामुळ सगळी धावपळ सांभाळत राहिली. आई-बाबा आणि भाऊ आता कधीतरी भेटायचे, पण फोन मात्र २-३ दिवसातून व्हायचाच. त्यातच दादाच लग्न झाल, आणि तो पण त्याचा संसारात बुडाला. आई-बाबा मात्र नं चुकता तिची चौकशी करायचे. 
अशीच वर्षांमागून वर्षे गेली . मधल्या काळात तिला एक गोड मुलगा झाला आणि तिची धावपळ वाढतच गेली. नोकरी सोडावी अस हज्जारदा मनात येऊन सुद्धा ती सोडू शकली नाही. तिचे सासू-सासरे वारल्यावर, तिच्या नवऱ्याच वागण बदलल्याच जाणवलं तिला. पण , कदाचित त्या दोघांच्या मृत्यूमुळे तो अस वागत असेल, अशी तीन स्वतःची समजूत करून घेतली.  त्यामुळ मनाच्या विरुद्ध ती नोकरी करत राहिली. आताशा तिला काहीतरी खटकायला सुरवात झाली. तिला धड कळत न्हवत पण काहीतरी बिनसलं मात्र नक्कीच होत. 
काहीतरी चुकत होत, सगळ सांभाळून सुद्धा , तू काहीही करत नाहीस, तुला काहीही जमत नाही, तुला काहींही येत नाही.अशा वाक्यांनी ती घायाळ व्हायला लागली. तिला पाउस खूप आवडायचा , पण तेच तिच्या नवऱ्याच्या डोळ्यावर यायला लागल. 'लहान आहेस का तू आता पावसात भिजायला? झाडाल फुल आल म्हणून इतक नाचायची काय गरज आहे? हं, काय तर म्हणे हा सिनेमा बघ आणि हे पुस्तक वाच. शांत बसव तर , बघ कशी बसली आहे, तुला काय इथ नुसत बसायला नाही लग्न करून आणल. जरा आजूबाजूला डोळे उघडून बघ. लहान नाहीस तू आता . एका मुलाची आई आहेस आणि हे कसली थेर? ' त्याच्या अशा टोमण्यनी ती बेजार व्हायला लागली. 
तिला काळातच नव्हत काय चुकतंय ते. आतापर्यंत ती अशीच जगात आली होती. आणि आत्ता आत्तापर्यंत तिच्या प्रत्येक गोष्टीच तिच्या नवऱ्याला आणि सासू-सासर्यांना कौतुक होत. आताच काय झाल मग? पण विच्रायाची सोय नव्हती. आजकाल तो खूपच चिडचिडा पण झाला होता. त्यांच्या मुलावार पण छोट्या छोट्या गोष्टीत चिडायचा. तीचे अश्रू आता पाउस पियुन टाकायला लागला. तीन हौसेन लावलेल्या गुलाबाच्या काळ्या खुडून टाकल्या जाऊ लागल्या...कसले हे भिकारचोट चाळे, प्र्यातेक शब्द तिच्या मनाला घर पडत होता. ती आतल्या आत सुकत चालली होती.
असाच एकदा तीन बर नाही म्हणून सुट्टी घेतली होती. तिच्या मैत्रिणीचा फोन आला, "पटकन ये". आवाजावरून काहीतरी घडल्याच जाणवलं तिला. ती पटकन रिक्षा करून तिथे गेली. तिच्या मैत्रिणीने नुसत डोळ्यानीच खुणावल. आणि त्या दिशेला ती बघतच राहिली. तो होता तिथे, तिचा नवरा आणि एक मुलगी . हो, मुलगीच होती ती,२५-२६ वर्षांची असेल. खूप आनंदात दिसत होता तो. गेल्या कित्येक महिन्यात त्याला इतक आनंदी बघितलं नव्हत तिन. ते दोघ भोवतालाच जग विसरून एकमेकात गुंतलेले तिला दिसत होते. ती बधीर झाली. 
तो घरी आल्यावर तिन शांतपणे विचारलं त्याला , त्या मुलीबद्दल. त्यान आकांडतांडव केल. माझा पाठलाग करतेस, माझ्यावर हेरगिरी करायला लागलीस म्हणून तो भांडत राहिला. ती फक्त मूकपणे रडत होती. आता तिला त्याचा वागल्याचा अर्थ समजत गेला. शेवटी त्यान काबुल केल, ती त्या मुलीमध्ये आणि त्याच्यामध्ये 'खास' नात आहे. ती मुलगी खूप वेगळी आहे. त्याच्यावर खूप प्रेम करते, ती आयुष्यावरच खूप प्रेम करते. जगण्याचा आनंद घ्यायला तिला आवडतो..सतत नव्याचा ध्यास असतो तिला....तिला पाउस आवडतो, फुल आवडतात, पुस्तक वाचायला आवडतात आणि त्यावर ती बोलते सुद्धा छान. दिसायला तर तू बघितलीच आहेस. आणि..आणि माझ प्रेम आहे तिच्यावार." ती बघतच राहिली त्याच्याकडे, अरे, मी अशीच होते ना? पण तोंडातून शब्द निघत न्हवता तिच्या. 
तिन शांतपणे निर्णय घेतला आणि आई-वडिलांकडे परत आली. एखाद्यावर जबरदस्ती करून ना प्रेम मिळवता येत ना आपण त्याला प्रेमात पडू शकतो. हे सत्य चांगलाच माहिती होत तिला, झगडून फक्त मनस्ताप मिळणार, त्यामुळे शांतच राहायचं ठरवलं तिन. 
आज पहिल्यांदा ती आई-बाबांशी बोलली. दोघांना पण वाईट वाटल. पण त्यांनी सांगितलं कि तू जो निर्णय घेशील आम्ही ठामपणे तुझ्या पाठीशी आहोत. 
तिन मुक्त केल त्याला....पण, तिचा विश्वास आहे कि तो परत येईल तिच्याकडे. तीच अजूनही प्रेम आहे त्याच्यावार आणि म्हणूनच ती वात बघण थांबवणार नाहीये...
आज बऱ्याच दिवसांनी office जाताना खूप शांत वाटत होत तिला..............