मुग्धाला तिच्या डेस्क वर एक रुबाबदार मुलगा बसलेला दिसला. त्याचा आत्मविश्वास त्याच्या चेहऱ्यावर पण दिसत होता. तिला बघून तिच्या काळजाचा ठोकाचं चुकला . ती गबाळ्यासारखी त्याच्याकडे बघतंच राहिली. त्याच्याशी बोलायचं धाडसच झालं नाही तिचं . पण तिला तो अगदी पहिल्या दृष्टीक्षेपातंच आवडला . ती भांबावून उभी असतांनाच तिच्या साहेबांनी हाक मारली आणि 'वरद ' अशी हाक मारली . 'वरद ,वरद .... ' तिच्या मनात नाद उमटंत गेला . "आजपासून तू याला रिपोर्ट करायचा , म्हणजे आजपासून हा तुझा बॉस ". काहीच नं कळुन ती साहेबांच्याकडे बघतंच राहिली . "अगं म्हणजे मी तुझा बॉस राहणारच आहे पण वरद तुमच्याबरोबर काम करेल आणि तुमच्या रजेचं वगैरे माझ्याकडे असेल . वरद आजपासून आपल्या ऑफिसला जॉईन होतो आहे . तू आणि शिल्पाने त्याला रिपोर्ट करायचं आहे . आजचा दिवस तो तुझ्या जागेवर बसेल , तू आणि शिल्पाने मिळुन त्याला सगळं समजावून सांगा . वरद , तुला काही गरज लागली तर मुग्धा ला सांग ." "हो सर , मी सगळी मदत करेन त्यांना ". शिल्पा पण बरोबर आहे म्हणजे झालं , तिच्या मनांत आलं . आत कशाला हा बोलेल आपल्या बरोबर ? मुग्धाला शिल्पा आवडंत नव्हती असं नाही. पण का कुणास ठावुक आता तिला ती बरोबर नको असं पण वाटत होतं तिला . तेवढ्यात तिला समोरून शिल्पा येताना दिसली तिला . खुपचं छान दिसंत होती आज ती . आल्या आल्या तिने मुग्धा ला हाय केलं ," काय गं ?अशी का दिसते आहेस ? घरी सगळं ठीक ना ? साहेब काही बोलले का? " तिने बोलता बोलता मुग्धाच्या पाठीवर हात ठेवला. 'हि इतकी चांगली कशी वागू शकते आपल्याशी ?हीच एकटी अशी आहे जीच्याशी आपण थोडंफार बोलू शकतो'. इतक्यात शिल्पाचं आणि वरदचं बोलणं कानावर पडलं आणि ती दचकली . आपण आपल्याच विचारात किती बुडलो होतो हे जाणवून ती अजुनच ओशाळली . तिच्या पाठीवर हात मारून शिल्पा वरदला म्हणाली , " तिच्या अश्या दिसण्यावर जाऊ नको हं . तिला खूप छान कविता महिती आहेत. आणि ती भरपूर पुस्तकं पण वाचते . आणि कामात तर ती १नंबर आहे . कळेलंच तुला ." वरद तिच्याकडे बघून छानसं हसत म्हणाला ," अरे वा ! छान . मला स्वतः ला कविता खूप आवडतात . मजा येईल तुझ्याबरोबर काम करायला . आता ऐकव बघू एखादी छानशी कविता . ती ऐकुनच कामाला सुरवात करू. " आता तर तिला त्याचा आवाज पण आवडला . पण कविता ऐकव म्हटल्यावर तिच्या मात्र तिचं त त प प व्हायला लागलं . तेवढ्यात शिल्पा पण म्हणाली , "ऐकव कि गं ". आता मात्र मुग्धाच्या गळ्यात आवंढा आला आणि तिला बोलताचं येईना . ती दोघांकडे बघत राहिली . दोघपण तीला आग्रह करत राहिले . आणि एकाएकी वरद तीला म्हणाला , " काय गं ? घाबरलीस का? अशी घाबरलीस तर कसं होणार गं? आपली मैत्री कशी होणार? चल, मीच ऐकवतो एक कविता .
अजुन नाही जागी राधा
अजुन नाही जागे गोकुळ
अशा अवेळी पैलतीरावर
आज घुमे का पावा मंजुळ
मावळतीवर चंद्र केशरी
पहाट वारा भवती भणभण
अर्ध्या पाण्यामधे उभी ती
तिथेच टाकुन अपुले तनमन
विश्वच अवघे ओठा लावून
कुब्जा प्याली तो मुरलीरव
डोळ्यांमधुन थेंब सुखाचे
"हे माझ्यास्तव हे माझ्यास्तव"
अजुन नाही जागी राधा
अजुन नाही जागे गोकुळ
अशा अवेळी पैलतीरावर
आज घुमे का पावा मंजुळ
मावळतीवर चंद्र केशरी
पहाट वारा भवती भणभण
अर्ध्या पाण्यामधे उभी ती
तिथेच टाकुन अपुले तनमन
विश्वच अवघे ओठा लावून
कुब्जा प्याली तो मुरलीरव
डोळ्यांमधुन थेंब सुखाचे
"हे माझ्यास्तव हे माझ्यास्तव"
" वा! माझी आवडती कविता आहे ही, इंदिरा संतांची" नकळत मुग्धा बोलुन गेली आणि वरद आपल्याकडेच बघतोय म्हटल्यावर ती लाजली.
आजचा दिवस बघता बघतां संपला. पहिल्यांदाच असं झालं होतं , आॅफीसला आल्यावर वेळ कसा गेला हे कळंलच नाही तिला. घरी आल्यावर पण तीच्या डोक्यातुन वरद जात नव्हता. त्याच बोलंण सारखं आठवत राहिलं तीला, मनांत त्याच्या शब्दांचे तरंग उमटत राहिले 'आपंण मित्र कसे होणारं?'
क्रमश:
सुहास शिरवळकर छाप जाणवत आहे, पण ठीक आहे
ReplyDelete