खूप अबोल होती ती, अगदी पहिल्यापासुन , नाही नाही पहिल्यापासून नाही , ती बनली होती अशी . मुलगी वयात येताना इतकी बंधनं घातली जातात कि त्यामुळे एकतर मुली घुम्या बनतात नाहीतात बंडखोर . खूप कमी घरं अशी आहेत, जी या वयातल्या मुलीना समजीन घेतात. असो , तिची प्रवृत्ती दुस-या प्रकारात मोडत होती . ती घुमी बनत गेली . ती म्हणजे "मुग्धा" . नावाप्रमाणेच मुग्ध . असो , तिच्या घुमेपणामुळे ती फारशी कुणामध्ये मिसळत नसे न तिला फारशा मैत्रिणी होत्या . जवळची तर एकही नव्हती. त्यामुळेच कोण जाणे पण ती तिच्या मैत्रिणींशी पण फारशी बोलू शकत नसे . भीती वाटायची तिला . ' आपल्या बोलण्याला हसल्या तर ?' सतत कसल्यातरी काळजीत असल्यासारखी वाटायची . तिला सतत असंच वाटायचं, जे घडतंय ते आपल्यामुळेच घडतंय , आपण विचित्र आहोत म्हणून घडतंय . आणि यातलं काही कुणाला कसं सांगणार ?
यावर उपाय म्हणून तीने पुस्तंक वाचायला सुरवात केली . तशी वाचनाची आवड तिला होतीच . आणि पुस्तक वाचनाला आई पण काही म्हणत नसे . घरात बसून काहीही करायला तिची ना नव्हती . मुग्धाला पण तेच बरं वाटायचं. पुस्तकात डोक घातलं कि ती आजुबाजुच्या जगाचं भान विसरत असे . तिचा वेळ कसा आज असे ते कळंतही नसे. तिला जास्त करून प्रेमकथा आवडत. हळू हळू तिने स्वतःच असं एक कल्पनाविश्व तयार केलं आणि त्यात ती रमत गेली . पण या सगळ्याचा परिणाम म्हणून कि काय तिच्या मैत्रिणी अजूनच कमी झाल्या. त्यातून आपल्याला जे वाटतंय ते सगळं चुकीचंच आहे असं तिच्या मनानं घेतलंआणि मनाला पण मोकळं सोडायला घाबरू लागली. स्वतः स्वतःच्या ब-याच वाटा बंद केल्या तिने . अशातच तीच शिक्षण पूर्ण झालं . आणि नोकरीसाठी वणवण सुरु झाली . प्रत्येकवेळी इंटरव्यु नंतर येणाऱ्या आईच्या टोमण्यांनी बेजार व्हायला लागली . काय करावं सुचेना तिला. पण तिचं नशीब जोरावर होतं. आणि लवकरचं तिला नोकरी लागली .
तिचं नवीन आयुष्य सुरु झालं , पण तिच्या लक्षात आलं कि आपलं आधीच आयुष्य आणि हे आयुष्य काही फार वेगळं नाहीये. आता तर आईचं बोलणं अजूनच कुत्सित व्हायला लागलं . ऑफिस मधंल वातावरण पण फारसं चांगल न्हवतं . ती एकटीच नवीन होती ऑफिस मधे. आणि जुन्या मुलींचे ग्रुप झालेले होते . आजूबाजूला वावरणाऱ्या मुली तशा पण थोड्या फॅशनेबल होत्या . तिला सुरवातीला त्यांनी बोलावयाचे प्रयत्न केले. ती पण गेली , पण त्यांचे विषय तिच्यासाठी खूप वेगळे होते . ते मुलांचे , कपड्यांचे , शॉपिंग चे विषय तिला नकोसे झाले . कारण यात बोलावं असा काही तिच्याकडे नव्हतंच. म्हणुन तीआपणहूनच त्यांच्यापासून लांब झाली . त्यातल्यात्यात तिची मैत्री फक्त शिल्पा बरोबर झाली . ती पण फक्त जेवायला जाण्यापुरती . ती शिल्पाकडे पण मोकळी होवू शकली नाही . आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून तीचं आतल्याआत कुढणं वाढलं . या सगळ्यातुन बाहेर निघण्यासाठी तिचं मन तडफडत होतं . त्यातूनच रात्र रात्र रडणं सुरु झालं तिचं .
अशाच निराश मनस्थितीत ती ऑफिस ला पोहोचली .
क्रमश:

मंगल...नंतर मुग्धा, विविध वयोगटातील स्ञीया आणि त्यांची कुटुंबात व समाजात होणारी कूचंबणा आपण समर्थपणे लिलया लघुकथेच्या माध्यमातून मांडत आहात. आपले अभिनंदन ...
ReplyDelete