मृण्मयी बघता बघता भुतकाळात शिरली .
"मनु , meet my friend , 'मीत' ", रेणुका ने तिची ओळख तिच्या बरोबर आलेल्या एका मुलाशी करून दिली . बघताक्षणीच तिला आवडले होते ते त्याचे डोळे , पिंगट रंगाचे , हसरे .
"काय गं ? कुठं हरवलीस ?" रेणुकाने , तिच्या मैत्रिणीने तिला भानावर आणले , तशी ती लाजलीच .
"oh , marvellous!", मीत म्हणाला .
" तू तिच्याशी अज्जिबात फ्लर्टिंग करू नको हं ', रेणुकाने त्याला दटावलं .
तसा खो खो हसत तो म्हणाला ," रेणु , वेडी काय गं तु ? काय वाटेल तिला ? मी दिसेल त्या मुलीच्या मागे लागतो असा समज होईल तिचा". बोलता बोलता त्याने मनु ला shake hand केलं .
मनुच्या स्वभावामुळे तिला फारशा मैत्रिणी नव्हत्या . पण रेणुकाशी तिची मैत्री चांगली होती . पण त्यातल्या त्यात ती एकटीच अशी होती कि जिच्या बरोबर मनु ला राहायला आवडत असे.
ती घरी आली . राहून राहून ते पिंगट डोळे आपला पाठलाग करत आहेत असा वाटायला लागलं तिला . मीत दिसायला भारदस्त होता , आणि स्वभावाने मिश्किल पण . त्यामुळे त्याच्याबरोबर तिला गप्पा मारायला आवडू लागलं . आता तर सगळे प्लान्स त्या तिघांचे असायला लागले . भरपूर धमाल करायचे तिघे मिळून . मनुला हा आपल्या आयुष्यातील सगळ्यात आनंदी काळ आहे असं वाटायला लागलं . त्याचबरोबर आपण आणि मीत एकमेकांच्या जास्त जवळ येत चाललो आहेत हे पण जाणवायला लागलं तिला . खरंच असं घडलं तर? आपण आणि मीत , स्वप्नांमध्ये रंगून जाणं आवडायला लागलं तिला .
पण, हळू हळू तिला जाणवायला लागलं कि रेणुका आपल्याशी नीट बोलत नाही आहे . आपण बरोबर असलो कि तिच्या कपाळावर आठी असते . मीत जेव्हा जेव्हा आपलं कौतुक करतो तेव्हा तेव्हा रेणु चा चेहरा पडतो .
रेणुका आता तिला टाळायचा प्रयत्न करते हे पण तिच्या लक्षात यायला लागलं. एक - दोन वेळा मनुने रेणूशी बोलायचा प्रयत्न केला, पण रेणुने ते टाळलं . 'तुझं तुलाच कळायला हवं ', असा म्हणून तिने विषय संपवला . मनु ला कळेना आपण काय करावं ? कारण तोपर्यंत तिला आपण मीत च्या प्रेमात आहोत याची जाणीव झाली होती.
आणि खरच एक दिवस या सगळयाचा भडका उडाला . कारण खुप साधं होतं. ते तिघे एकत्र असताना , मनु जायला निघाली, तिची घरी जायची वेळ झाली होती . मीत ने पटकन तिचा हात पकडला आणि आणि थोडावेळ थांबायला सांगितलं .
"मीत , हात सोड तिचा ," रेणुकाचा एकदम टिपेचा आवाज ऐकु आला , मीत आणि मनु दचकलेच. मीत ने पटकन तिचा हात सोडला आणि खूप आश्चर्याने तिच्याकडे बघायला लागला . रेणुका त्याच आवाजात म्हणाली , " तु माझा आहेस आणि फक्त माझा . तुझा आणि तिचा काहीही संबंध नाही . तू तिचा हात तरी कसा धरू शकतोस ? का फसवतो आहेस मला ? " रेणुकाच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं होतं. तिच्या आरड्याओरड्याने मनुला एकदम कसनुसं झालं . आजूबाजूला बसलेले लोक पण त्यांच्याकडे बघायला लागले. डोळ्यातलं पाणी लपवत , मान खाली घालून ती लगेच निघून आली होती .
मनूच्या मनाला रेणुकाचं वागणं खूप लागलं होतं , आपण तिची माफी मागायला हवी , हे तिच्या मनानं घेतलं . तिनं खूप धीर धरून रेणुकाला फोन केला पण पलीकडून काहीही उत्तर आलं नाही . पुढचे दोन दिवस मनु सतत तिला फोन करायचा प्रयत्न करत राहिली , तिने मेसेज पण पाठवून बघितले . पण रेणुका कडून काहीच उत्तर आलं नाही . शेवटी धीर धरून तिने रेणुका च्या घरी जायचं ठरवलं . तशी १-२ वेळा ती तिच्या घरी गेली असल्यामुळे तिला रेणुकाच घर माहिती होत .
मनाचा हिय्या करून तिने दाराची बेल वाजवली. रेणुकाच्या आईने दरवाजा उघडला . " अगं मृण्मयी , ये ना . आत ये . "
"काकु , रेणुका आहे का ?"
"आहे आत आहे , आणि काल तिच्या साखरपुड्याला का आली नाहीस? "
"रेणूचा साखरपुडा झाला ?", मनूच्या आवाजात आश्चर्य होतं .
"घ्या , म्हणजे या मुलीने तुला ते पण नाही सांगितलं ? अगं , तसंपण आमच्या मनात तीच आणि मीत च लग्न व्हाव असं होतंच. तुला माहिती आहे न मीत ? ( मनुने नकळत मान डोलवली ). मीत , रेणूच्या पप्पांच्या मित्राचा मुलगा . खूप हुशार आहे . लग्न झाल्यावर त्याला अमेरिकाला पाठवायचं ठरलं आहे . तिकडे पण ऑफिस सुरु करायचा विचार आहे . दोन दिवसापूर्वी अचानक म्हणाली उद्याच्या उद्या आमचा साखरपुडा करा . अगं , किती समजावलं तिला . पण हिचा हट्ट सुरु झाला. आणि तुला माहिती आहे , रेणूचे पप्पा तिच्यावर किती प्रेम करतात ते . मग काय ? केला घराच्या घरी".
मनु ला जबरदस्त धक्का बसला , तोंडाला कोरड पडली . डोळ्यातून पाणी यायला लागलं.
"आत आहे बघ ती , भेट जा तिला ".
जड पायाने मनु रेणूच्या खोलीकडे वळली . रेणू तिच्या पलंगावर पालथी पडून मोबाईल वरती काहीतरी वाचत होती. मनुने हलकेच तिला हाक मारली . रेणू झटकन उठली, डोळे मोठे करून तिरस्काराने ती ओरडली ,"तु ? हिम्मत कशी झाली तुझी इथे यायची ? परवाचा तमाशा पुरा झाला नाही का तुला ? माझ्या मीत ला माझ्यापासून हिरावून घ्यायचा विचार पण मनात आणु नको . त्याच्या किंवा माझ्या जवळपास पण यायचा प्रयत्न नको करू तू . " मनुला काही कळेना . ती अस्पष्ट शब्दात म्हणाली , "रेणू , ऐक ना ".
"काय ऐकू ? ," रेणू कडाडली ," तू नसलीस तरी मीत तुझ्याबद्दलच बोलत राहतो . सतत मनु , मनु . आम्ही जेव्हा भेटतो तेव्हा तू हवीसचं . परवा तर हात पण धरला त्याने तुझा. बस्स झालं . तू जा इथून आणि परत अशी येवु नको ". मनु सुन्न झाली .
क्रमश: