खूप खुश होती आज ती …एकदम आनंदात होती …सगळ्या जगाला ओरडून सांगायची इच्छा झाली होती तिची . ती आई बनणार होती ..तीच पूर्ण शरीर आनंदान भरून गेला होत . तिच्या चेहऱ्यावरून आनंद अगदी ओसंडून वाहत होता . तिचा नवरा पण खूप खुश झाला होता . लग्नाला दोन वर्ष झाली होती आणि अतिशय आतुरतेने ते ह्या बातमीची वाट पाहत होते. दोघींनी office ला सुट्टी टाकली आणि आपल्या आवडीच्या ठिकाणी जाऊन बसले - वरळीला …समुद्र बघत .. आपल गुपित दोघांनी समुद्राशी share केल ..आभाळाशी share केल ..गेल्या वर्षभरापासून दोघ एकटेच होते …दोघींचे पण आई - वडील वैष्णोदेवीच दर्शन घेऊन परत येत असताना accident मध्ये गेले होते …त्या दुखः तुना बाहेर पडता पडता हि news कळल्यामुळे त्यांना खूप आनंद झाला होता.
तो खूप काळजी घेत होता तिची …तिन राजीनामा द्यायचा ठरवलं . तिला कोणतीही दगदग करायची नाही असा डॉक्टरांनी सांगितलं होत . त्याची पण संमती होती . ती आता घरीच असायला लागली . आपण आपल्यासारखा एक जीव जन्माला घालणार या विचाराने हरखून गेली होती ती . ती सतत बाळाचाच विचार करत होती , कस असेल ते ? कोण असेल , मुलगा का मुलगी ? आपण खूप छान सांभाळू त्याला . त्याला मोठ करताना त्याच्या वयाचे होऊन समजून घेवू त्याला . दिवस कसे जात होते तिला काळतच नव्हत .
त्याला थोडी काळजी वाटत होती . रोज office मधून घरी आल्यावर ती दिवसभर बाळाबद्दल काय विचार केला ते सांगत असायची. ती खूप जास्त गुंतत चालली होती ..त्याला ते लक्षात येत होत पण तो काहीच करू शकत नव्हता . दोघांचे आई -वडील गेल्यावर कोसळेली ती पहिली होती त्याने , त्यापेक्षा आताची ती सावरली होती , नुसती सावरलेली नाही तर आनंदात असलेली बघून बर पण वाटत होत त्याला . खूप प्रेम करत होता तो तिच्यावर आणि म्हणूनच जन्माला न आलेल्या बाळाबद्दल थोडीशी असूया पण वाटत होत i त्याला .
पण खरच कितीवेळा आपण जे ठरवतो ते घडत ?? तिच्याबाबतीत पण हेच घडल ….साध निमित्त मंदिराच्या पायऱ्या चढताना पाय सकातला …आणि ती धाडधाड 15-20 पायऱ्या खाली आली …पायरीवरून तोल जाऊन सरळ पोटावार आपटली आणि बेशुद्ध झाली ..
याचा परिणाम व्हायचा तोच झाला. तिला घेऊन तो घरी आला आणि रिकाम घर बघून तिला गलबलून आल. खरतर घर रिकामाच होत आधीपण फक्त आधी तीच बाळ होत तिच्याबरोबर .
तिला घर आता खायला उठत होत. काय कराव ते समजत नव्हत. ती वेड्यासारखी झाली होती. तीच घराकडे दुर्लक्ष व्हायला लागलं.तीच त्याच्याकडे दुर्लक्ष व्हायला लागल. तो कधी येतो कधी जातो काही कळत नव्हत तिला. त्याला त्रास व्हायला लागला आता...त्याच वजन झपाट्यानं कमी झाल..तिला यातून कसा बाहेर काढाव हेच कळत नव्हता त्याला. जसजसे दिवास जात होते तसतशी तीच वागण जास्तच विचित्र व्हायला लागल. डॉक्टरांनी त्याला तिला कुठतरी लांब घेऊन जायचा सल्ला दिला. त्याप्रमाणे त्यान एक मस्त trip arrange केली नैनितालला. जायची तयारी अर्थातच त्यालाच करायची होती. तिला घेऊन तो बाहेर गेला shopping साठी .
ज्या दुकानात ते गेले तिथे अचानक तिला तिची मैत्रीण दिसली.अर्थात तिनेच हाक मारली. काय ?, कसा? वगैरे गप्पा झाल्यावार तिने विचारलं,"काय ग? सगळ ठीक आहे ना? अशी काय वाटते आहेस हरवल्यासारखी?". "काही नाही , काही नाही म्हणत ती दुकानात शिरली. त्यान मात्र तिला phone करायला सांगितला आणि मदत हवी आहे असा पण सांगितलं. तस पण तिन नोकरी सोडल्यापासून कुणाचा संबंध राहिला नव्हता.
तिला phone वर सगळ सांगितल्यावर तिच्या मैत्रिणीला पण वाईट वाटल. तिन त्यादोघांना office ला यायला सांगितलं. office च नाव ऐकून त्यान थोडा विचार केला पण तो तयार झाला.
ती एका वेश्यावस्तीत त्यांच्या मुलांसाठी शाळा चालवत होती. त्या दोघांना तिथे आलेल बघून तिला बर वाटल. त्या मुलांबरोबर एक दोन आय पण होत्या.......
त्या मुलांची मस्ती बघत राहिली ती...हळूहळू हसायला लागली. त्यांच्याशी बोलायली लागली...ती मुल पण लगेच चिकटली तिला. "उद्या येते", म्हणून निरोप घेतला तिन. परत येताना तिला खूप बर वाटत होत. काहीतरी भरल्यासारख वाटत होत. तिच्याकड बघून त्याला पण बर वाटल. तिन त्याला तिथे जाऊ का म्हणून विचारलं? तिच्या सध्याच्या अवस्थेत नाही म्हणण जीवावर आल त्याच्या.
ती रोज जायला लागली. हळूहळू तिथे mix व्हायला लागली. तिथे येणाऱ्या बायकांच्या कहाण्या एकून तिला वाईट वाटत होत पण मनातून आपली स्थिती कितीतरी चांगली आहे हे बघून बर पण वाटत होत...ती तिच्या frustration मधुन बाहेर यायला लागली. डॉक्टरांनी त्याला सांगितलं, आपल्यपेक्षा जास्त दुखी लोक बघून तिला आपल दुख कमी झाल्याची जाणीव झाली आहे, शेवटी दुख आणि सुख मानाण्यावार आहे. काही लोकांसाठी छोट्या छोट्या गोष्टीपण खूप दुख्दायक ठरतात आणि काही लोक खूप मोठ्या गोष्टी पण सहज स्वीकारतात. शेवटी आपल मन जे आणि जसं मानत तेच खर.