आज सकाळ तशी आळसावलेली होती. घड्याळात बघितले आणि ती दचकलीच , एक तास उशीर झाला होता तिला . त्यात आईने तिच्या नावाने ठणाणा सुरु केला . आईपेक्षा आज वरद महत्वाचा होता तिला त्यामुळे आईच्या बोलण्याकडे तीने लक्ष दिलं नाही आणि आवरायला सुरवात केली . एवढ्या वर्षात पहिल्यांदाच तिला जाणवलं कि आपल्याकडे एकही ड्रेस चांगला नाही. खट्टू झाली ती . त्यातल्यात्यात बरा ड्रेस घालून ती ऑफिस ला गेली आणि जाताजाताचं तिने ठरवलं कि आपण शिल्पा ला विचारु , आपल्याबरोबर खरेदीला येशील का म्हणून . तिला कळंत यातलं खूप . आणि तसंही कितीही झालं तरी ती एकटीच अशी होती जिची मदत होवू शकली असती. ऑफिस मध्ये आल्याआल्या तिची नजर वरदला शोधत शोधत त्याच्यावर जाउन स्थिरावली आणि तो आपल्याकडेचं बघतो आहे म्हटल्यावर दचकली . खाली मान घालून धडधडत्या हृदयाने आपल्या जागेवर येवून बसली .
दुपारी शिल्पा जेवायला हाक मारेपर्यंत ती तशीच काम करत राहिली . जेवण हसत खेळत पार पडलं. म्हणजे वरद आणि शिल्पा हसत होते , गप्पा मारत होते आणि मुग्धा मात्र मान खाली घालून त्यांच बोलण ऐकत होती. १-२ वेळा दोघांनी तिला गप्पात ओढायचा प्रयत्न केला . पण ती गप्प राहिलेली बघून त्यांनी परत आग्रह केला नाही .
जेवून परत आल्यावर मात्र ती शिल्पाच्या जागेवर गेली . "शिल्पा , माझं एक का आहे . मदत करशील का गं?"
"बोल ना , काय झालं?"
"अगं मला थोडी खरेदी करायची आहे , येशील का ? जावूया का आज ? "
"आज? बंर , सांगते घरी आईला , जाऊया आपण ".
मुग्धा एकदम खुश झाली , शक्य असतं तर , लगेचंच गेली असती ती . संध्याकाळी दोघींनी मिळून तिच्यासाठी चांगले ५-६ ड्रेस घेतले . ती सगळे ड्रेस शिल्पाच्या आवडीचे घेत होती. शेवटी परत निघताना शिल्पा म्हणाली पण तिला , "काय गं ? काय विशेष आहे आज ? एकदम एवढे सगळे ड्रेस आणि ते पण माझ्या आवडीचे ? "
"काही विशेष नाही गं . तुला कळंत त्यातलं म्हणून."
"हो ? पण हा साक्षात्कार आता कसा झाला बाई ? एका वर्षाने ? शहाणे , सहा महिन्यापूर्वी तुला चांगले ड्रेस घे म्हटलं तर आजीबाई किती घाबरल्या होत्या ? मग आता काय झालं ? थांब , थांब काही बोलू नको . हा वरदइफेक्ट नाही ना ? बोल , बोल ?"
तीच बोलण एकूण मुग्धा खूप लाजली . हिला कसं कळंल ? नकळतच तिची मान नाही नाही म्हणत खाली गेली . तशी शिल्पाने हसायला सुरवात केली . "अगं लाजू नको इतकी , मला हा बदल आवडला तुझ्यातला म्हणून चेष्टा केली फक्त ". तरीपण शिल्पा जे समजायचं ते समजली .
दुस-या दिवशी नवीन ड्रेस घालताना तिच्या मनात आलं , वरद बघेल न ? त्याला ड्रेस आवडेल न ? त्याच्या लक्षात येईल का ? काय म्हणेल तो आपल्याला ? त्याला समजेल आपल्याला तो आवडला आहे ते ? हा विचार मनात येताच लाजली ती . आणि पटापट आवरून ऑफिस ला पोहोचली . काळाच्या प्रसंगाची पुनरावृत्ती नको म्हणून सरळ खाली मान घालून ती जागेवर गेली . खरतर ती आत आली तसा वरद तिच्याकडेच बघत होता . आणि त्याला तिच्यातला बदल जसा लक्षात आला तसं त्याच्या चेहऱ्यावर स्मित आलं . तो उठून तिच्याकडे गेला ,
"आज काहीतरी विशेष आहे का ?"
"न नाही ", ती गडबडली आणि बघतच राहिली त्याच्याकडे . "नाही म्हणजे ऑफिस मधे काही असेल तर माहिती नाही मला "
"अगं ऑफिसबद्दल नाही विचारात आहे तुला , खूप छान दिसते आहेस आज . "
त्याच्या बोलण्यावर लाजली ती आणि वरद च्या तोंडातून हलकी शीळ बाहेर पडली . तेवढ्यात मागून येत शिल्पा म्हणाली ,"वरद, अरे तू बोलतो आहेस , हेच विशेष आहे तिच्यासाठी ". मुग्धाला अगदी कानकोंड झालं .
अशी कशी हि शिल्पा ? काहीही सांगतेय . असं बोलतात का ? उगाच नेलं काल आपण तिला . इकडे वरद आणि शिल्पा हसत होते . शिल्पा तेवढं बोलून निघून गेली , तसा वरद तिला म्हणाला , "खरंच का गं ? काहीही असलं तरी खूप छान दिसते आहेस तू आज ". हे आईकून तिने मान वर केली , तर वरद तिच्या डोळ्यांमधेच बघत होता . ती लाजली . आज मात्र जेवताना तीच लक्ष पूर्णपणे वरद कडेच होतं. तो काय खातोय , काय बोलतोय आणि तिला जाणवल कि ओ पण आपल्याकडे बघत असतो .
हे असं रोजच घडायला लागंल आता . ती ऑफिस ला पोहोचल्यावर वरद जर बोलायला आला नाही तर चुकल्याचुकल्या सारखं व्हायला लागलं . आता तर ती पण आपणहून त्याच्याशी बोलायला जायला लागली . आणि तिचं जगचं जणु स्वप्नांचं होवून गेलं . आजूबाजूला काय चाललं आहे यातलं लक्ष उडालं तिचं . तिच्यासाठी सगळीकडे वरदचं असायला लागला . पण , अलीकडे शिल्पा ला मात्र आपण तिसरे असल्यासारखं वाटायला लागलं . आणि तिने मुग्धाला वरद वरून चिडवायला सुरवात केली . मुग्धाच्या स्वप्नांना पंख फुटले आणि तिने लग्नाची स्वप्न रंगवायला सुरवात केली .
क्रमशः

No comments:
Post a Comment