प्रत्येकाचा काही न काही भुतकाळ असतो , तसा तिचा पण होता . चांगला का वाईट हे काही तिला ठरवता येत नव्हतं . चांगल्या गोष्टींनी तिला घडवलं होतं तर वाईट गोष्टींमुळे चांगल्याच महत्व तिला पटलं होतं . स्वभावाने जात्याच सोशिक असल्यामुळे, वाईट घडलं तरी त्यातून मार्ग काढत होती ती .
आता अशा वळणावर होती कि तिला निर्णय घ्यायचा होता . असा निर्णय जो तीच विश्व बदलणार होता . आई -बाबां नंतर सांभाळलेल्या काकांनी एक स्थळ आणलं होतं . काकांनी कधीच कोणत्याही गोष्टीसाठी जबरदस्ती केली नव्हती तिला. तिचा कल बघूनच ठरवायचे ते . यावेळी मात्र काका खूप सविस्तर बोलले होते , त्यांना मुलबाळ नव्हतं, त्यामुळे त्यांनी आपलं सगळं प्रेम तिच्यावर उधळून दिलं होतं . उद्या आपण या जगात नसल्यावर मृण्मयी एकटी कशी राहणार या काळजीनं ते आतून पोखरून निघाले होते . मृण्मयीला हे सगळ जाणवलं होतं काल . त्यातून स्थळ चांगलंच होतं . देखणा , चांगली नोकरी , उच्च शिक्षीत, दादर सारख्या ठिकाणी ६ खोल्यांचा फ्लॅट , एकुलता एक असा प्रसाद आणि गावाकडे जमीन बाळगून असणारे आणि निवृत्ती नंतर तिथेच राहणारे त्याचे आई - बाबा. म्हणजे स्थळ असं कि, कुणी नाकारू नये . आणि दुसरीकडे तिचा भूतकाळ पुसून टाकणारी नोकरीची संधी , दुस-या शहरातली .
आई - बाबा गेल्यावर ज्या काकांनी एवढ सांभाळलं त्याचं मन तरी कसं मोडायचं ? आणि भविष्य स्वतःच्या बळावर घडवायचं असेल, तर मिळणारी संधी कशी सोडायची ? विचार करून करून डोकं दुखायला लागलं तिचं . कात्रीत अडकल्यासारखं वाटतं होतं . ऑफीस मध्ये कुणाच्या काहीही लक्षात येवू नये म्हणून कॉम्पुटर मध्ये डोकं घालून बसली होती. आणि तेवढ्यात तिचा मोबाईल वाजला , कुणाचातरी व्हाॅट्स अॅप्प वर मेसेज होता. तिने नाव वाचलं आणि थोडं आश्चर्य वाटलं . उत्तर नाही दिलं तर वाईट दिसेल म्हणून तिने उत्तर दिलं .
"हाय "
"तुला राग येवू नये म्हणून प्रार्थना केली , आणि मगच मेसेज केला . I hope तुला राग आला नसेल ????".
" नाही राग नाही आला . पण माझा नंबर कुठून मिळाला तुम्हाला ?"
"अगं, तुझ्या काकांकडून घेतला. आपण कुठल्याही निर्णयापर्यंत येण्याआधी एकमेकांशी बोलू , आणि मग आपला निर्णय सांगू ".
खरंतर त्याचा फोन येईल याची कल्पना होती तिला . काकांनी सांगितलं होतं तसं . तरीपण त्याचा मेसेज बघून तिच्या छातीतील धडधड वाढली . तिने उत्तर दिलं नाही , तसा थोड्यावेळात परत त्याचा मेसेज आला ,
"काय ग ? काय झालं ? "
"काही नाही , हातातलं काम संपवलं ".
"sorry , माझ्या लक्षात आलं नाही . तू कामात असशील तर नंतर बोलूया आपण ".
तिची तिलाच लाज वाटली .
"नाही नाही , बोला तुम्ही. झालंच माझं ". तिने उत्तर दिलं .
"तुम्ही ??? अगं , अरे तुरे कर मला . उगाच म्हातारं झाल्यासारख वाटतं ".
तिच्यापण नकळत हसली ती .
"OK "
"मृण्मयी तुला पटताहेत का माझे विचार ? आपण आधी बोलूया आणि मग निर्णय घेऊ ".
" हो , मला पटतंय हे . आपण बोलूया आधी ".
"ठरलं तर मग , संध्याकाळी तुझ्या ऑफिस जवळच्या CCD मध्ये भेटूया . मी पोहोचेन ६.३० पर्यंत ".
"OK "
त्याला उत्तर देवून तिने लगेच काकांना फोन केला . "मनु , मुलगा आणि त्याच्या कडचे सगळे चांगले आहेत . तुझ्या मनात काय आहे ते पण मला माहिती आहे . तू योग्य निर्णय घेशीलच . आणि तो कोणताही असला तरी मी तुझ्या बरोबर आहे . "
मृण्मयी कॉम्पुटर कडे बघत शांत बसली होती . मनात प्रचंड खळबळ उडाली होती . काय सांगू प्रसाद ला ? कुठून सुरवात करू ? काय म्हणेल तो ? पण काहीही झालं तरी त्याला 'मीत' बद्दल सांगायलाच हवं . जे घडल ते सगळं . हे ठरवल्यावर थोडं शांत वाटलं तिला .
क्रमश.

छान सुरुवात. कथा उत्तम असणार ह्याची खात्री आहेच. :-)
ReplyDeleteपु.ले.शु.
सुरुवात छान झालीय... उर्वरित भागाची प्रतिक्षा आहेच..😀
ReplyDelete