आता सगळे दिवस आनंदाने भरलेले होते . सगळं जग एकीकडे आणि मीत आणि तीच जग दुसरीकडे , असं काहीसं वाटत होतं तिला . येणारा प्रत्येक दिवस मीत प्रेमाने भरून टाकत होता , जणू आधीची सगळी दु:खं पुसून टाकायची होती त्याला . मृण्मयी ला त्याच्या बरोबर काढलेला प्रत्येक क्षण जसा च्या तसा आठवत रहायचा . तिला मीत भेटला कि काळ तिथेच थांबून रहावासा वाटत होता . दोघं मिळून त्यांच भविष्य रंगवत रहायचे .
एवढ्या काळात तिची आणि रेणुकाची काही परत भेट झाली नव्हती . तरीपण मृण्मयीला एक प्रकारचं आश्चर्य वाटत होतं कि रेणुकाने हे सगळं स्वीकारलं कसं ? एके दिवशी तिने मीत ला विचारलंच . मीत चा चेहरा पडला , तो काहीच बोलला नाही . मृण्मयीने खूपच हट्ट धरला .
"मनु ", मीतचा आवाज पडला होता .," मी सांगितलं नाहीये अजून रेणुकाला ".
"काय ?" मनु ला एकदम खुप अस्वस्थ वाटलं .
"मला संधीच मिळाली नाहीये गं "
"अरे पण मीत , हे असं कसं चालेल ?"
"मनु , तू काळजी नको ग करू , मी सांगेन त्यांना . मी ठरवलं होतंच कि १-२ दिवसात सांगेन . कारण , कारण ".
"कारण काय मीत ?" धास्तावलेल्या आवाजात मनु ने विचारलं .
"मला असं वाटतंय कि ते सगळे लग्नाच्या तयारीला सुरवात करतील लवकर . कालच रेणूच्या पपांचा फोन आला होता . १-२ दिवसात भेटून लग्नाची तारीख पक्की करूया म्हणून ". त्याच पडलेल्या आवाजात मीत सांगत होता .
मनु ला आपण काय बोलावं हे सुचेना . ती वेड्यासारखी मीत च्या चेहऱ्याकडे बघतच राहिली . खूप अस्वस्थता दाटून आली तिच्याभोवती अचानक . ते घरी जायला निघेपर्यंत मीत तिची समजूत काढत राहिला , पण मनु च्या कानापर्यंत जणू काहीही पोहोचतच नव्हंत .
त्याच अस्वस्थतेत ती घरी आली . रात्री स्वप्नात पण आपण कुठेतरी खोल काळोखामध्ये बुडतोय अशीच स्वप्नं पडत राहिली तिला . सकाळ पण अस्वस्थच होती . मीतला भेटावं आणि त्याच्याशी बोलावं अशी तीव्र इच्छा झाली तिला . काकांनी विचारलं पण तिला , काही बिनसलं आहे का ? काकू तर संशयानच बघत होती .
इतक्यात दारावरची बेल वाजली . एवढ्या सकाळी कोण आलं म्हणत काकांनी दरवाजा उघडला . कोण आलं आहे , बघायला बाहेर आलेली मनु दचकलीच . रेणुका ची आई होती . रडुन रडून डोळे सुजलेले आणि चेहऱ्यावर प्रचंड काळजी .
"या न काकु , आत या . रेणु ठीक आहे नं ?" मनु ने पुढे होत विचारलं .
काकुंनी रडायला सुरवात केली ," तुझ्यापुढे भिक मागते मृण्मयी , तू मीत ला सोड . माझ्या रेणु ला वाचव ".
मनु दचकलीच . काय हे ?
" काल रात्री मीत घरी आला होता . त्याने हे लग्न होणार नाही म्हणून सांगितलं आहे . त्याच तुझ्यावर प्रेम आहे आणि त्याला रेणूशी लग्न करायचं नाहीये ", काकू स्फुंदत म्हणाल्या ," माझ्या लेकीला वाचंव गं , कालपासून रडतेय , जीव द्यायची धमकी देतेय . आज सकाळी तर गळफास लावून घ्यायचा पण प्रयत्न केला . तिचे पप्पा वेळेवर पोहोचले म्हणुन बरं ".
मनु दिग्मूढ झाली.
"पदर पसरते ग मृण्मयी तुझ्यापुढे . माझी एकुलती एक लेक आहे गं . उद्या तिला काही झालं तर , मी कशी जगु गं ? तू मीत ला आज नाहीतर उद्या विसरून जाशील . तो पण रेणूशी लग्न झाल्यावर तुला विसरेल . ऐक गं . एक आई भिक मागतेय तुझ्याकडे ".
मनु च्या डोळ्यातून नकळत पाणी यायला लागलं. आई , अशी असते ? एवढं प्रेम ? माझ्या पेक्षा किती मोठ्या आहेत या आणि रेणु साठी इतक्या व्याकूळ होत आहेत ? माझी आई असती तर ? तिने पण असंच केलं असत का ? ती पण अशीच धावून गेली असती का?
विचारात अडकलेल्या मृण्मयीच्या खांद्यावर काकांनी हात ठेवला आणि ती भानावर आली . रेणुची आई तशीच तिच्यापुढे पदर पसरून रडत होती .
तिने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला ," काकु , रेणू खूप भाग्यवान आहे . मी कधीच आड येणार नाही तिच्या . "
काकुनी तिच्याकडे बघितलं आणि एकवार या आईवेगळ्या पोरीला कवटाळावसं वाटल त्यांना . पण त्या घाईघाईने बाहेर पडल्या .
मनु तिच्या खोलीत आली . मोबाईल बघितला तर मीत चे जवळ जवळ १० फोन होते आणि तितकेच मेसेज पण होते . तिने मेसेज उघडले . त्यात त्याने रेणु ला लग्न करणार नाही म्हणून सांगितलं आणि त्यावर घरी झालेला गोंधळ सांगितला होता . तो खूप आनंदात होता कारण शेवटी त्याच त्याच्या बाबांनी ऐकल होतं . त्याला लवकरात लवकर मनु ला भेटायचं होत .
मनूच्या नकळत तिच्या तोंडातून हुंदका बाहेर पडला . तिच्या लक्षात पण आलं नाही कि तिच्या मागोमाग तिचे काका पण आत आले होते .
"बाळ ", काकांनी खूप प्रेमाने हाक मारली तिला . मनु वळली आणि काकांच्या मिठीत गेली . तिच्या पाठीवर थोपटत ते म्हणाले
"मनु , किती अवघड निर्णय घेतला आहेस . मागचे काही दिवस तुझ्या आनंदात असण्याच कारण मला आत्ता कळलं आणि त्याचबरोबर तुझा निर्णय पण . बाळा, त्या बाईच तू ऐकायला हवं असं नाहीये . तुमचं जर खरंच एकमेकांवर एवढं प्रेम असेल तर , मी तुझ्या पाठीशी उभा आहे ".
मनु थोडी शांत होत म्हणाली ," नाही काका . माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे . पण एका आईचं आपल्या मुलीवर जेवढं असंत तेवढं नाही . काका , माझी आई असती तर , तिनेपण असंच केलं असंत नं ? आणि मग माझी आई जर माझ्याकडे काही मागायला आली असती तर , मी नाही म्हटलं असंत का ? काका , मी माझा जीव पण दिला असता ".
काकांच्या डोळ्यात पाणी आलं . त्यांना खूप आतून त्यांच्या दादा आणि वहिनीची आठवण आली .
मनुला आता मीत ला काय आणि कसं सांगाव हे कळंत नव्हत . ठरल्याप्रमाणे तिने त्याला भेटायचं ठरवलं .

No comments:
Post a Comment